।। श्री गिरिजामाता प्रसन्न ।।
श्रीक्षेत्र महेशमाळ : श्री गिरिजा देवी संस्थान (म्हैसमाळ) हे तिर्थ क्षेत्र मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर (औरंगाबाद) येथून अवघ्या ३७ किलोमीटर अंतरावर असून येथे येण्यासाठी औरंगाबाद येथील मध्यवर्ती वस स्थानकामध्ये सकाळी ८:५० मि. असून तर दुपारी १:५० वा. बसेस असतात. तसेच रत्नपुर (खुलताबाद) येथून नियमीतप्रमाणे वाहने चालु असतात. श्रीक्षेत्र महेशमाळ येथे येतांनी औरंगाबादहून दौलताबादचा देवगिरी किल्ला हे प्रेक्षणीय स्थळ, त्याचबरोबर श्री क्षेत्र रत्नपुर येथे श्री. भद्रा मारोती मंदिर पण या मार्गामध्ये येते. येथूनच ११ किमी अंतरावर श्री क्षेत्र महेशमाळ असून अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये हे येळगंगा नदीच्या तिरावर वसलेले आहे. या गावाचा नाव लौकिक आहे. तो खऱ्या अर्थाने'श्री गिरिजामाता मंदिर' माता पार्वतीचा अवतार असलेली श्री गिरिजा माता महिमा आपण या पुस्तिकेमधून बघणार आहोत. येथे श्री गिरिजामातेच्या मंदिरा बरोबरच श्री गोरक्षनाथ गुंफा मंदिर, श्री व्यंकटेश मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री महादेव पुरातन मंदिर, श्री हनुमान मंदिर, सुफी संतांचे असताना बाबा पिर इत्यादी देवी देवतांची मंदिरे येथे आहेत.
।। श्री गिरिजामाता प्रसन्न ।।
महेशमाळ हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून, येथे भगवान शंकरांनी कठोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे या स्थळाला 'महेशमाळ' असे नाव मिळाले, जे पुढे 'म्हैसमाळ' म्हणून ओळखले जाऊ लागले. हे स्थान सह्याद्री पर्वतात, समुद्रसपाटीपासून सुमारे ३०४४ फूट उंचीवर आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख ‘महेशाद्री’ असा आढळतो. येथे मराठवाड्याच्या कुलदैवत श्री गिरिजा मातेचे मंदिर आहे, ज्याची आख्यायिका काशीखंडात वर्णन केलेली आहे. एके काळी भगवान शिव आणि माता पार्वती आनंदवनात सारेपाट खेळत असताना शिवशंकर पराभूत झाल्याने संतप्त होऊन तपश्चर्येत लीन झाले. भगवान शंकर हरवल्याने माता पार्वती व्याकूळ झाल्या, तेव्हा नारदमुनींनी त्यांचे ठिकाण सांगितले. मात्र, भगवान शिव क्रोधित असल्याने माता पार्वतीने भिल्लीन नारीचे रूप धारण करून महेशमाळ पर्वतावर भगवान शिवाची सेवा केली. त्यांच्या सौंदर्यावर मोहित होऊन भगवान शिवांनी विवाहाची विनंती केली, पण भिल्लीन नारीने नकार दिला. शेवटी देवीने गिरिजा तीर्थ येथे आपले खरे रूप प्रकट केले, ज्यामुळे भगवान शिव अचंबित झाले. काही काळ येथे भगवान शिव व माता पार्वतीने वास्तव्य केले, मात्र माता पार्वती संकोच वाटत असल्याने भगवान शंकरांनी येथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला स्त्री होण्याचा शाप दिला. येथे केवळ दोन कावळे दिसतात, जे शुभ मानले जाते. अखेरीस माता पार्वती 'गिरिजा' या रूपात येथे गुप्त झाल्या आणि याच ठिकाणी गिरिजा व येळगंगा नद्यांचा उगम झाला.
जय देवी जय देवी जय गिरिजा माता सर्व जनाची वारी तु चिंता ।। जयदेवी धू. ।। गिरिजा तीर्थ स्थान जे तुझे होते तेथुन म्हैसमाळाशी आले तू माते गावाच्या पश्चिमेस केली तू वस्ती ।। नाना रिती तन-मन वाढविली भक्ती ।।१।। काही साधुंनी तपश्चर्या केली त्यांना दर्शन देऊन गुप्त तु झाली बहु लोकांनी नवस केले त्यांना पाहून तु संकट चुकविले ।।२।। भिल्ली होऊनी तु जना तारिले कापारी बैसोनी चमत्कार दिधले सर्व जनामध्ये गेली तुझ किर्ती तेव्हापासून माघात यात्रा तुझी भरती ।।3।। तुझे स्वरूप पाहता मन माझे रमले तुझीया प्रसादे अज्ञान हरले जिकडे पहावे तिकडे अंबा मज भासे ज्ञानाचा तो साठा हृदयी प्रकाशे ।।४।। जय देवी जय देवी जय गिरिजा माता सर्व जनाची वारी तु चिंता ।। जयदेवी धृ. ।।
।। ग्रामीण यात्रा – गिरिजा माता यात्रा ।।
संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा एक अनोखा संगम
भारतीय संस्कृतीत गिरिजा माता मंदिर यात्रांना विशेष महत्त्व आहे, विशेषतः ग्रामीण भागातील यात्रा या केवळ धार्मिकच नसून सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे प्रतीक असतात. याच परंपरेत गिरिजा माता यात्रा ही एक अनोखी आणि आनंददायी यात्रा आहे, जी सतत ४-५ दिवस चालते आणि सुमारे ५० ते १०० गावांतील लोक या यात्रेत सहभागी होतात..
ही यात्रा म्हणजे केवळ एका देवीचे दर्शन घेण्यापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण समाजाला जोडणारी, आनंद देणारी आणि प्रत्येक वयोगटासाठी काही ना काही घेऊन येणारी परंपरा आहे.
Portfolio